जामनेर पाचोरा पीजे रेल्वे विस्तारीकरणासाठी ९५५ कोटी मंजूर.... मंत्री रावसाहेब दानवेंची घोषणा
पीजे रेल्वे विस्तारीकरणासाठी ९५५ कोटी मंजूर अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली पाचोरा ते जामनेर (पीजे) ब्रॉडगेज व बोदवडपर्यंतच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ९५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे. तसेच जालना ते जळगाव या १७४ किमीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी डीपीआर मंजूर झाला आहे, अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी जामनेर येथे केली.
जामनेर येथे रविवारी दुपारी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, रेल्वे अर्थसंकल्पात राज्याला यावेळी सर्वाधिक ११ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. रेल्वे राज्यमंत्री
झाल्यानंतर सर्वाधिक कामे राज्यात केली. विमानतळांसारखी चकचकीच रेल्वे स्थानक करावयाची आहेत. खान्देशातून पुण्यासाठी नवीन गाडी सुरु करण्याची मागणी काही जणांनी केली. त्यावर दानवे म्हणाले की, पॅसेंजर चालविणे हे सर्वात तोट्याचे काम आहे. तुम्ही मागणी करुन तुम्ही तर मोकळे झाले, मात्र नविन गाडी सुरु करणे जिकीरीचे झाले आहे. जालना - जळगाव नवीन मार्गामुळे खान्देश हा दक्षिण भारताशी जोडला जाईल, असेही दानवे यांनी सांगितले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्ष साधना महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकरे, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष साधना महाजन, माजी आमदार स्मिता वाघ डॉ.राजेंद्र फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश (राजुमामा) भोळे , खा. रक्षाताई खडसे , खा.उन्मेष पाटील , आ.संजय सावकारे , आ.मंगेश चव्हाण , माजी आ.चंदूलाल पटेल , माजी आ.स्मिताताई वाघ , जामनेर नगराध्यक्ष सौ.साधनाताई महाजन , जामनेर तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत बावस्कर , तुकाराम अप्पा निकम , छगन दादा झाल्टे , शिवाजी नाना सोनार , दिलीप खोडपे सर , जिल्हा चिटणीस नवल राजपूत , शहराध्यक्ष आतिष झाल्टे , भाजयुमो अध्यक्ष निलेश चव्हाण , उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर , शरद पाटील सर , जे के दादा चव्हाण , तालुका सरचिटणीस आंनद लव्हरे , रवींद्र झाल्टे , जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे , नंदू महाजन , भाजयूमो तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण सर , माजी जि.प. सभापती जयपाल बोदळे , जि. प. सदस्य विलास बापू , अमित भाऊ देशमुख , सुनीता ताई पाटील , नामदेव मंगरूळे , तसेच सन्माननिय सर्व नगरसेवक , तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी , लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment