भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका महिला आघाडी कार्यकारणी जाहीर.तालुका अध्यक्षपदी रंजना विजय धुमाळ यांची निवड


 जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीची तालुका बैठक नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर येथे राहत्या घरी पार पडली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,सरचिटणीस रवींद्र झाल्टे उपस्थित होते.यावेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी रंजना विजय धुमाळ यांची निवड करण्यात आली व तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका बैठकीमध्ये नगराध्यक्ष साधना महाजन यांनी व महिला आघाडी यांनी खडकी येथील अंगणवाडी सेवा पंधरवडा निमित्ताने दत्तक घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते यावेळी दिले. कार्यकारणी पुढीलप्रमाणे:-  सरचिटणीस पदी उज्वला गोसावी वाकोद, वैशाली सुभाष चौधरी जामनेर, उपाध्यक्षा पदी पल्लवी संजय सूर्यवंशी जामनेर,प्रतिभा मधुकर नारखेडे गाडेगाव,मनीषा धनराज राजपूत बेटावद खुर्द,आशाबाई शंकर जाधव पहुर कसबे,रूपाली महेश पाटील पहूर पेठ,सविता नाना पाटील सवतखेडा,जया सतीश पाटील रांजणी, कविता दिपक शेळके भारुड खेडा, चिटणीस पदी मिराबाई नामदेव माळी जामनेर,सुवर्णा विजय पाटील नागन चौकी,वर्षा किशोर पाटील जामनेर,रजिया बी गफार पठाण शेंदुर्णी,ज्योती राजू साबळे भागदरा,रेखा ज्ञानेश्वर राठोड लॉन्ड्री तांडा,मनीषा सुनील चौधरी फत्तेपूर,लता ईश्वर चंदने जामनेर, सदस्य पदी मुक्ता विजय गोपाळ मोराळ,ललिता प्रल्हाद महाजन सामरोद,विणा अंगद कासार जामनेर,विद्या योगेश मोते जामनेर,वर्षा संभाजी पाटील खजिनदार जामनेर,दर्शना अतुल पाटील,रेखा शामकुमार पोळ,भाग्यश्री संघवी सर्व जामनेर यांची बैठकीत निवड करण्यात आली

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....