शेळगावचे सुपुत्र अशोक राजपूत यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार
तळेगाव ता जामनेर ता.१९
शेळगाव तळेगाव येथील रहिवासी व हल्ली मुक्काम सिंधी येथे असलेले श्री. अशोक राजपूत त्यांची १९९२ ला एमपीएससी मार्फत पोलीस विभागात निवड झाली. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथम नियुक्ती नागपूर येथे झाली. त्यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तालय,अँटी करप्शन विभागा औरंगाबाद, अहमदनगर जिल्हा मध्ये एमआयडीसी व राहुरी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी म्हणून सात वर्षे काम पाहिले. सीआयडी विभाग औरंगाबाद, त्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा, नेरूळ पोलीस स्टेशन, पनवेल तालुका पोलीस स्टेशन, येथे काम केले, त्यानंतर चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड या ठिकाणी कर्तव्य बजावले. १९९२ पासून आता पावतो अवैध दारू विक्री करणारे गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्या, अंमली पदार्थ विकणारे गुन्हेगार , दरोडा ,अवैद्य शास्त्र विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्या टोळ्यांना जेरबंद करून बरेच गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आणले. जबरी चोरी घरफोडी, वाहन चोरी, महिलांचे मंगळसूत्र तोडून पळणारे, दरोडा करणाऱ्या टोळ्या जेरबंद केल्या व त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकिस आणून माननीय न्यायालयात बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आरोपींना सजा झालेली आहे. खुनाचे सुद्धा बरेच संवेदशील गुन्हे मोठ्या सीताफिने उघडतीस आणण्यात त्यांना यश आलेले आहे. व सदर गुन्ह्यांमध्ये माननीय न्यायालयाने आरोपींना दोषी धरून जन्मठेपे सारख्या शिक्षा दिलेल्या आहेत. त्यांना चांगल्या कामगिरीमुळे शासनाकडून २००८ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली व नंतर डिसेंबर २०२१ मध्ये पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आलेली असून सध्या अशोक राजपूत हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून गुन्हे शाखा ठाणे शहर येथे नेमणुकीस आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना वरिष्ठांकडून ७०० बक्षिसे व १४० प्रशंसापत्र प्राप्त झालेले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांच्यामार्फत घेतली गेली आहे. राष्ट्रपतींचे सरहानिय सेवा मेडल घोषित करण्यात आले. सदर मेडल अशोक राजपूत यांना दिनांक १३ आक्टोबर २०२० रोजी माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोशियारी महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. तसेच यावेळी मा. श्री एकनाथजी शिंदे,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक श्री रजनीश सेठ महाराष्ट्र राज्य श्री संजय कुमार पोलीस महासंचालक व यांची राजभवन मुंबई येथील कार्यक्रमास हजेरी होती.या पुरस्कारामुळे तळेगाव शेळगावातील राजपूत कुटुंबाचे सर्व स्तरांवर अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment