पहुर पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तोरणाळा चे उदघाटन

प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर अंतर्गत आरोग्य उपकेंद्र तोरणाळाचे उदघाटन पहुर पोलीस स्टेशन चे  पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व तोरणाळा चे सरपंच युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत यांनी धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. डॉ.संदीप जाधव व डॉ.श्यामल इंगळे यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका अनुराधा तायडे यांनी केले तर आभार आरोग्य सहाय्यक भागवत वानखेडे यांनी मानले.
सदर प्रसंगी "माता सुरक्षित तर घर सुरक्षित"मोहिमेंतर्गत 17 गरोदर महिलांची आरोग्य तपासणी तसेच,हिमोग्लोबीन, बीएमआय, वजन,उंची,अलबुमीन आदी रक्ततपासणी करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून उपकेंद्राचे कामकाज करण्यासाठी जागा दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानून उपकेंद्राचे राहिलेले कामकाज पूर्ण करून देण्याचे व आरोग्य यंत्रणनेस सहकार्य करण्याचे आवाहन आपल्या प्रास्ताविकात डॉ.सोनवणे यांनी केले.
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या कामकाजाचे कौतुक करून त्यांना ईश्वर सम आल्याची भावना व्यक्त केली व पोलीस आणि आरोग्य खात्याचे कामकाज आपल्या दैनंदिन जीवनात नियमित पडत असल्याचे सांगितले.डॉ.पल्लवी राऊत यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना पदाधिकारी व नागरिकांनी सहकार्य केल्यावर कामकाजाचा निर्देशांक वृद्धिंगत होऊन कामकाज करण्याची ऊर्जा मिळते असे आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.किरण धनगर,मनीषा वाकोडे,सुनंदा सोनवणे,सुनील पाटील,सारिका मांडोळे,गटप्रवर्तक सुनीता पाटील,आशा स्वयंसेविका अर्चना पाटील,उषा पाटील,अनिता सुरवाडे,संगीता तायडे,ज्योती पवार,अंगणवाडी सेविका लता पाटील,शोभा पाटील,बेबाबई पाटील,मंगला पाटील,माधुरी तायडे,ज्ञानेश्वर चौधरी ग्रामस्थ महेंद्र पाटील,सुपडुसिंग पाटील,जालमसिंग पाटील,कृष्णा पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....