तळेगावचे डॉ. चौधरी यांना धन्वंतरी पुरस्कार
जामनेर तालुका निमा( National integrated medical association )संघटना की ज्या संघटनेची स्थापना दहा वर्षापूर्वी जामनेरात झालेली आहे. या संघटनेकडून वैद्यकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या विभूतींचा सन्मान केला जातो. अशा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जामनेरातील जीनिस पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सभागृहात १६ आक्टोबर रोजी करण्यात आले होते .आरोग्य सेवेसाठी समर्पित असे आयुष्य जगत असताना ज्यांनी आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला. अशा विभूतींचा सत्कार या कार्यक्रमात यावेळी करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निमाचे अध्यक्ष डॉ. नंदलाल पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.आर के पाटील जामनेर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे डॉ.संदीप पाटील डॉ .चंद्रशेखर पाटील डॉ.राजेंद्र ललवाणी डॉ.सुषमा पाटील डॉ.प्रशांत भोंडे डॉ.संजीव पाटील हे होते .कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने व दीप प्रज्वलन करून करण्यात आले ..तालुक्यातील डॉ.एम बी चौधरी तळेगाव डॉ. पंढरीनाथ बसेर ,डाँ. स्नेहांकिता लोखंडे जामनेर डॉ. व्हि .के. पाटील,डॉ एस डी महाजन या मान्यवरांचा शाल ,श्रीफळ,गुलाब पुष्प, धनवंतरी प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त या पाचही विभूतींचे कार्य जामनेर तालुक्यासाठी प्रेरणादायी असेच आहे .
यातील डॉ. एम.बी.चौधरी यांनी आपल्या जीवनातील सुमारे पन्नास वर्ष तळेगावसह परिसरातील पंचक्रोशीत आरोग्यसेवेसाठी प्रदान केली आहे. सत्तरच्या दशकातील काळ अत्यंत खडतर होता. या परिस्थितीमध्ये ते २४ जानेवारी १९७३ रोजी तळेगावात रूजू झाले व तळेगाव सह परिसरात त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली .सेवतील सुमारे 33 वर्षे त्यांनी शासकीय पातळीवरून तळेगावसह परिसरास सेवा दिली .नंतर ते मे २००५ मध्ये निव्रत्त झाले.आजही त्यांचे कार्य अविरतपणे सूरुच आहे. डॉ चौधरी यांची ५० वर्षांची वैद्यकीय जीवनात ग्रामीण भागात होत असलेली ही सेवा भविष्यात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. आजही डॉ .चौधरी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक तरुण डॉ. त्यांच्या संपर्कात असतात.एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे डॉ चौधरी यांनी वैद्यकीय सेवेत एक आदर्श निर्माण केला आहे. वैद्यकीय सेवेत अनुभव हा सर्वात मोठा दागिना असतो .त्याबळावरच डॉ चौधरी हे आजही हे परिसरातील एक दिपस्तंभच आहेत.अनेक रूग्णांना जीवनदान देणारे डॉ चौधरी हे परिसरातील लोकांची एक संपत्तीच आहे !!!!! त्यांचे चिरंजीव डॉ राजेश चौधरी हे सावदा येथील नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत.
Comments
Post a Comment