झोक्यात झोपलेल्या एक वर्षाच्या निर्भय ला फाशी बसून मृत्यू ....
-१६ मे 2023 रोजी अवघ्या नऊ दिवसांपूर्वी ज्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला असा वंशाचा दिवा असलेला निर्भय हा झोक्यात झोपला असताना झोक्यातच त्याला फाशी बसून दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याचा करून अंत झाला. सर्वांचा लाडका असलेला एक वर्षाचा निर्भय अचानक सोडून गेल्याने पूर्ण इंगळे परिवारावर शोककळा पसरली असून शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे .
येथील गिरजा कॉलनी मधील रहिवासी वसंत इंगळे आपल्या पत्नी व सालीसह राहतात. वसंत इंगळे हे ड्रायव्हर असून सध्या ते कुरियर चे काम पाहतात. तर पत्नी रुबी हॉस्पिटल येथे कामाला आहे. आज दुपारी वसंत इंगळे हे कामानिमित्त बाहेर होते. त्यांच्या पत्नीने दुपारी रुग्णालयात ड्युटीवर जायचे म्हणून बाळाला दुग्धपान करून त्याला झोक्यात झोपविले. बाळ बाळ झोक्यातून पडू नये म्हणून त्याला मध्यभागी मोठ्या रुमालाने बांधले. बाळाची देखभाल करण्यासाठी मावशी घरीच होती. बाळाला मावशीच्या हवाली करून बाळाची आई रुग्णालयात ड्युटीवर निघून गेली. मावशी बाळाच्या आई इतकीच बाळाची मोठी काळजी घेत होती. परंतु आज नीयतीच्या पोटात काही वेगळेच दडले होते. बाळ झोक्यात शांतपणे झोपलेला आहे हे पाहून बाळाची मावशी समोरच्या घरात जेवण करायला गेली. दरम्यान मध्येच एक चक्कर मारून बाळ झोपले असल्याची तिने खात्री केली. मात्र अवघ्या एक वर्षाच्या निर्भय वर काळाने घाला घातलाच. घरात झोक्यात एकटाच झोपलेला असताना त्याला जाग आली व त्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. झोक्यातून पडू नये म्हणून त्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या रुमाला मध्येच अडकून त्याला फाशी बसून त्याचा मृत्यू झाला. सर्वांचा लाडका असलेला निर्भय असा अचानक सोडून गेल्याने सर्वत्र त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment