मातीमिश्रीत रेतीने संरक्षण भिंतीचे बांधकाम काम सुरू...
शनिवार, १४ ऑक्टोबर
पहुर - जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील स्मशानभूमी येथील संरक्षण भिंतीचे काम मातीमिश्रीत रेतीने सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अश्या मागणीसह कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावण्याची जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील स्मशानभूमी येथील चांगले संरक्षण भिंतीचे काम करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांमधून केली जात होती. पहुर कसबे येथील स्मशानभूमी येथील संरक्षण भिंतीचे काम काही दिवसांपासून सुरू करण्यात आले असून चक्क त्या संरक्षण भिंतीच्या कामाला मातीमिश्रीत रेती वापरली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. संरक्षण भिंतीचे काम ईस्टीमेट प्रमाणे होत आहेत का ? कोणत्या योजनेतून हे काम सुरू आहेत ? किती रूपयांचे हे काम सुरू आहेत ? या कामाचा ठेकेदार कोण आहेत ? कोणत्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहेत ? संरक्षण भिंतीच्या कामाला वापरली जाणारी विट चांगली आहेत का ? यासह आदी प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केले जात असून याकडे लक्ष देवून, कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावा
कोणत्या योजनेतून काम सुरू आहेत ? किती रूपयांचे काम आहेत ? , काम सुरू करण्याची तारीख, कामाची कालमर्यादा, कोणत्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहेत त्याचे नाव, कोणत्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहेत त्यांचे नाव, यासह आदी माहिती फलकावर असावी व ते माहीत फलक कामाच्या ठिकाणी लावावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांन मधून केली जात आहे.
पहुर कसबे गावात किती विकास कामे झाले ?
वर्षभरात जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावात झालेल्या विकास कामांच्या ठिकाणीही माहिती फलक लावण्यात यावेत कारण आपल्या पहुर कसबे गावात कोणते विकास कामे किती रुपयांचे झाले आहेत याची माहिती सर्व नागरिकांना व्हावी यासाठी हे माहिती फलक लावावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
Comments
Post a Comment