पाचोरा तालुक्यात गुटखा किंगचा हैदोस.... आमचे हात दिल्लीपर्यंत


जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
पाचोरा तालुक्यातील लोहारा, पिंपळगाव हरेश्वर व पाचोरा येथील गुटखा किंग सर्व नियम व कायदे खिशात ठेवून दिवसाढवळ्या, राजरोसपणे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हे गुटखा विक्रेत्यांनी कायदा आमच्या बापाचा समजून भरवस्तीत, राहत्या घरी, दुकान, पानटपरी, शेतातील गोदामात किंवा काण्या, कोपऱ्यात अडगळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करुन ठेवला असून मागणीनुसा आसपासच्या खेड्यापाड्यातील किराणा दुकान, पान टपरी, हॉटेल, उपहारगृहात हे गटखा किंग घरपोच सेवा देत असल्याने गावागावात, खेड्यापाड्यातील वाडावस्तींवर मुबलक प्रमाणात गुटखा विक्री केला जात आहे. विशेष म्हणजे हे अवैधरित्या गुटखा विक्री करणारे व्यावसायिक गल्लीत राहुन आमचे हात दिल्लीपर्यंत असल्याचे खुलेआमपणे बोलून आम्ही संबंधितांना हप्ते देतो असे सांगून गावपातळीवर दहशत निर्माण करत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला पण त्याला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र गुटखाबंदी तसेच मादक पदार्थ विक्री कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने आजही शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचे पालन होत नसल्याने तसेच काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आश्रयाखाली हातभट्टी दारू, गुटखा, मावा विक्री हे  अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे गुटखा कारवाईत दोषी असलेले पहुर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी व एक सहाय्यक कर्मचाऱ्यांला नुकतेच निलंबित करण्यात आले आहे.
असे असले तरीही आजही पाचोरा तालुक्यातील मोठ्या शहरातून काही गुटखा किंग आपला व्यवसाय राजरोसपणे करत असल्याने पाचोरा  तालुक्यातील खेड्यापाड्यात, वाडावस्तींवर किराणा दुकान, पान टपरी, हॉटेल, उपहारगृहात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होतांना दिसून येते आहे. यामुळे अल्पवयीन मुलांसह लहान, थोर, जेष्ठ, श्रेष्ठ या गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने सुज्ञ नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....